अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांची सरकारला चेतावणी !
मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर मराठा आमदारांकडून हिवाळी अधिवेशन बंद पाडू, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी सरकारला दिली आहे. विशेष म्हणजे आरक्षणाच्या सूत्रावर आता सत्ताधारी आमदारच आक्रमक झाल्याने सरकारसमोरील संकट आणखी गडद होत आहे.
मराठा आरक्षण मिळालं नाही, तर हिवाळी अधिवेशन बंद पाडणार : नीलेश लंके यांचा सरकारला इशारा
नगर : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापला असतानाच मराठा आरक्षण मिळालं नाही, तर मराठा आमदाराकडून हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याची तयारी आमदार नीलेश लंके यांनी दर्शवली आहे. pic.twitter.com/VG6YQwPHyB
— I Love Nagar (@ilovenagar) October 28, 2023
मावळमधील कार्ला येथे मराठा समाजातील बांधव आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. या वेळी या ठिकाणी पारनेर येथील आमदार नीलेश लंके यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी वरील चेतावणी दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने राज्यातील गावांमध्ये नेते आणि मराठा आंदोलक यांच्यात वाद वाढत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना समाजाच्या रोषालाही सामोरे जावे लागले; मात्र आमदार नीलेश लंके यांना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही.