
निपाणी – २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे होणारा श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा उत्सव धार्मिक कार्य असल्यामुळे निपाणी भागातील सर्व प्रकारची मटण, चिकन, मासे, तसेच देशी अन विदेशी मद्य (दारू) यांची विक्री एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना कर्नाटकच्या वतीने उपतहसीलदार मृत्युंजय डगी आणि नगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले. या वेळी श्रीराम सेनेचे निपाणी तालुकाप्रमुख श्री. अमोल चेंडके, सर्वश्री बबन निर्मले, अजित पारळे, अजित पाटील, चारुदत्त पावले, रवींद्र शिंदे, पवन अंकुशे, आर्यन माने, प्रथमेश माने उपस्थित होते.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !