पुणे येथे व्यावसायिकाची ५२ लाखांची फसवणूक करणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

पुणे – माल खरेदी केल्यावर सवलतीचे आमीष दाखवून एका व्यावसायिकाकडून ५२ लाख ८ सहस्र रुपयांची मागणी घेऊन पैसे घेतले; मात्र तो माल आणि पैसे परत न करता आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सुशांत कमलनारायण यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तौफीक साबुवाला आणि फातिमा साबुवाला यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. ही घटना ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत कोथरूड येथे घडली आहे.

संपादकीय भूमिका 

गुन्हेगारीत आघाडीवर असलेले धर्मांध ! अशांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !