इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र-धर्म यांविषयी भाविकांचे प्रबोधन !

इचलकरंजी – येथे २ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती’द्वारे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ, तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत ७ जानेवारीला हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यात हिंदु धर्मावर होणारे आघात आणि त्यांवरील उपाययोजना, मंदिर सरकारीकरणामुळे होणारे दुष्परिणाम यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याचा लाभ ३५० भाविकांनी घेतला.

सौजन्य महानकार्य न्यूज 

या प्रसंगी प्रचार समितीचे अध्यक्ष श्री. गोविंद बजाज, ‘पंचगंगा वरद विनायक मंडळा’चे कार्याध्यक्ष श्री. अशोक स्वामी, सचिव श्री. द्वारकाधीश सारडा, व्यवस्थापक  श्री. गजानन स्वामी, सर्वश्री रामदेव राठी, गोविंद सोनी, श्याम काबरा उपस्थित होते. ‘यापुढील काळात अशा कार्यक्रमांमध्ये समितीला प्रबोधन करण्यासाठी बोलवू’, असे संयोजकांनी सांगितले.