पिंपरी (पुणे) येथे ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पा’च्या पडताळणीसाठी खासगी सल्लागार नको !

पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (एस्.टी.पी.) कार्यान्वित आहेत कि नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी खासगी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपकडून ‘सॅनिटरी नॅपकीन’चा घोटाळा !

शिंदे म्हणाले, ‘‘या व्यवहारामध्ये मनपाची २४ लाख रुपयांची हानी होत असल्याने शहरातील भाजप लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना याविषयी लेखी पत्र दिले आहे. या दोघांच्या वादातून मनपाला ‘सॅनिटरी नॅपकीन’ खरेदी करता येत नाहीत.”

विटा-खानापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन !

न्यूमोनियाच्या संसर्गामुळे त्यांना ३० जानेवारी या दिवशी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.

आळेफाटा (जुन्नर) येथील आरोपी पोलिसांना चुकवून वाहनातून बेडीसह पळाला !

आळेफाटा पोलीस ठाण्याचा आरोपी जुन्नर येथून पोलिसांना चुकवून बेडीसह फरार झाला आहे. पोलीस अंमलदार भुजंग सुकाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुन्नर पोलिसांनी अजय तानाजी मुठे याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

श्रीरामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त देवबाग (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे शोभायात्रा !

पुष्पक विमानाच्या चित्ररथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, गरुड आणि हनुमंत या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या होत्या. देवबाग येथील श्री विठ्ठल मंदिर येथे शोभायात्रा आल्यावर महिला ढोल पथकाच्या तालावर यात्रेतील महिलांनी भगव्या पताका उंचावत फेर धरून नृत्य केले.

दसरा चौकात सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक !

शहरात लक्षतीर्थ वसाहतीमधील अवैध मदरसा प्रकरणावरून दिवसभर तणावाचे वातावरण चालू असतांना दसरा चौकातून शालेय सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या एका बसवर अज्ञातांनी दगडफेक केली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे लेखा परीक्षण ८ वर्षे झालेच नाही !

पी.एम्.आर्.डी.ए. सारख्या कायद्याने स्थापित झालेल्या संस्थेचे गेली ८ वर्षे लेखा परीक्षण होत नाही, ही गोष्ट गंभीर आहे.

तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकासासाठी राज्य नियोजन विभागाकडून ८ कोटींच्या निधीचे वितरण !

जेजुरी गडविकास आराखड्याचा ३४९ कोटी रुपयांचा आराखडा संमत करण्यात आला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील १०९ कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन झाले आहे.

मराठा समाजाचे सर्वेक्षण २ फेब्रुवारीपर्यंत चालणार !

नागरिकांनी पडताळणीसाठी येणार्‍या प्रगणकांना साहाय्य करावे, आवश्यक ती माहिती योग्य शब्दांमध्ये द्यावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील बँकांत अडकलेले पैसे मागणार्‍या ठेवीदारांवर पोलिसांचा लाठीमार !

डबघाईस आलेल्या अनेक बँका आणि पतसंस्था यांमध्ये सहस्रो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.