नाशिक – एका नामांकित शाळेतील इयत्ता दहावीच्या १५ ते १७ वयोगटातील ५ अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून पोलिसांनी ७ चॉपर, १ कोयता आणि १ गुप्ती (एकप्रकारचे धारदार शस्त्र) अशी घातक शस्त्रे कह्यात घेतली. या मुलांच्या शाळेतील एक दहावीचा विद्यार्थी भूगोलचा शेवटचा पेपर देऊन एका मुलाला मारहाण करायला येणार होता आणि तो येताच त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी ही शस्त्रे जमवली होती, असे समजते. या वादामागे प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला वेळीच ही माहिती मिळाल्याने पुढील गंभीर प्रसंग टळला आहे. पोलिसांनी चिंतबन परिसरात सापळा रचला होता. पोलिसांनी या विद्यार्थ्यांना कह्यात घेतले आहे. ही शस्त्रे या मुलांनी गुजरातमधील बडोद्याहून मागवली होती.
…अन्यथा पालकांवर कारवाई करू !नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे या मुलांचे समुपदेशन करत आहेत; मात्र ‘अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग काही अल्प होतांना दिसत नाही’, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी पालकांना चेतावणीवजा आवाहन केले आहे, ‘‘स्वतःच्या मुलांवर लक्ष ठेवावे; अन्यथा आता पालकांवर कारवाई करू.’’ |
संपादकीय भूमिका
|