पुणे – औंध जिल्हा रुग्णालयातील २ परिचारिका रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त संक्रमण केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना निलंबित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याची नोंद घेत या संदर्भातील अहवाल जिल्हा रुग्णालयाकडून मागितला आहे.
परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे चुकीच्या रक्तगटाचे रक्त संक्रमित झाल्याने रुग्णांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे परिचारिकांना निलंबित करून तो अहवाल संमतीसाठी पाठवला असल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.