पुणे – घरातील पाण्याचा नळ चालू का ठेवला ? याविषयी विचारणा केली म्हणून मारहाण करणार्या युसूफ शेख आणि उमन शेख यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मानस भौमी यांनी तक्रार नोंद केली आहे. आरोपी आणि तक्रारदार हे एकमेकांच्या शेजारी रहातात. आरोपी शेख हे घरातील पाण्याचा नळ चालूच ठेवत असल्याने तक्रारदारांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी याविषयी विचारणा केली. त्याचा राग मनात धरून आरोपींनी मानस यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे दात पाडले. (अशा प्रकारे पाणी वाया घालवणार्यांचे पाणी कायमचे तोडण्याची शिक्षा दिली पाहिजे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? – संपादक)