रसायनमिश्रीत पाणी साेडल्याचा परिणाम
डोंबिवली – येथील एका नाल्यात रासायनिक आस्थापनांतून रसायनमिश्रीत पाणी सोडले जात आहे. या रासायनिक पाण्यामुळे येथील नाल्याला निळा रंग आला असून त्या पाण्याच्या उग्र दर्पाने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. यापूर्वीही रासायनिक सांडपाण्यामुळे नाल्यातील पाण्याला हिरवा, निळा, लाल रंग आला होता.
राज्यशासनाने १५६ रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. ‘भविष्यात असेच रसायनयुक्त पाणी नाल्यात दिसल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल’, अशी चेतावणी मनसेचे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकानागरिकांच्या जिवाशी खेळणार्या संबंधितांना कारागृहातच डांबायला हवे ! |