मुंबईत हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या धर्मांधाला अटक !

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या धर्मांधावर कठोर कारवाई व्हायला हवी !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – माहिमच्या रहेजा उड्डाणपुलावर हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणाला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ५४ लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. सरफराज अब्दुल माजिद अहमद (वय २६ वर्षे) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तराखंड येथील रहिवासी आहे. आरोपी सध्या वसई-नायगाव येथे वास्तव्यास होता. रहेजा उड्डाणपुलावर एक तरुण संशयास्पद हालचाली करतांना आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे २७० ग्रॅम हेरॉईन सापडले. सरफराज अहमद नावाचे आधार आणि पॅनकार्ड, भ्रमणभाष, ५ सहस्र रुपये रोख असा मुद्देमाल आढळला. त्याने हेरॉईनचा साठा कुठून आणला होता, तसेच ते तो कुणाला विकणार होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका :

मुंबईला पंजाबप्रमाणे अमली पदार्थांची नगरी बनवण्याचे षड्यंत्र उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांना एवढा विलंब का झाला ?