मतदान केंद्रावर गोंधळ घातल्यामुळे शिरूरमधील (पुणे) उमेदवारावर गुन्हा नोंद !

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात बंदी असतांना हडपसर विधानसभा मतदारसंघातील मुंढवा परिसरातील ‘सारथी प्रसारक मंडळ ज्ञानदीप इंग्लीश स्कूल’ येथील मतदान केंद्रावर चित्रीकरण करण्यात आले.

पंचगंगा नदीत अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी विनाप्रक्रिया मिसळत असल्याचे संयुक्त पहाणीत सिद्ध !

केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवासारख्या उत्सवात प्रदूषणाचे कारण पुढे करून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करणारे महापालिका प्रशासनाचे या गंभीर प्रदूषणाकडे दुर्लक्ष का ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : घाटकोपर येथे होर्डिंगसाठी झाडांना दिले विषारी इंजेक्शन !; वादळामुळे नवी मुंबईत ३० हून अधिक झाडे उन्मळून पडली !…

मुंबईतील घाटकोपर परिसरात मोठे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. हे होर्डिंग लावतांना आजूबाजूच्या झाडांना विषारी इंजेक्शन देऊन जाळण्यात आल्याचे समजते.

अमरावती महापालिकेतील ७०० कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

अमरावती महापालिकेतील ७०० कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. वारंवार आंदोलन करूनही आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

थोरले नानासाहेब पेशवे यांचे कर्तृत्व दुर्लक्षित ! – डॉ. उदय कुलकर्णी, इतिहास अभ्यासक

थोरले नानासाहेब पेशवे यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी अनेक मोहिमा केल्या आहेत. त्यांच्या काळात मराठेशाही उच्च पदावर पोचली.

गुरुपौर्णिमेची सेवा दास्यभक्तीचा आदर्श ठेवून करूया ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिंगुळी, कणकवली आणि बांदा येथे जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी त्यांचे अनुभव आणि साधनेविषयी आलेल्या अनुभूतींचे उत्स्फूर्तपणे कथन केले.

सांगली महानगरपालिकेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत १४ मे या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज ….

मुंबईसह राज्यातील सर्व होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करा !

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लेखी, तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना १४ मे या दिवशी ऑनलाईन निवेदन दिले आहे.

घाटकोपर दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, होर्डिंग उभारणार्‍या आस्थापनाचा संचालक भूमीगत !

मोठमोठ्या होर्डिंगमुळे येणार्‍या अडचणींचा विचार दुर्घटना घडल्यावर केला जातो हे संतापजनक !

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुभाजकावर झाडे लावण्याचा कामात भ्रष्टाचार !

जी झाडे लावण्यात आली आहेत, असे सांगण्यात येते. त्या ठिकाणी झाडे नसून ‘भटक्या गुरांनी झाडे खाल्ली’, असे हास्यास्पद उत्तर संबंधित ठेकेदार देत आहे.