
सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत १४ मे या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या अभिवादन कार्यक्रमास उपायुक्त वैभव साबळे, मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, साहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, ‘सिस्टीम मॅनेजर’ नकुल जकाते यांसह अन्य उपस्थित होते.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !

सांगली – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या अभिवादन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !