चांगल्या अर्थाने इतिहास पालटण्याचे कार्य चालू झाले आहे ! – विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार

वसाहतवादाच्या छायेतून बाहेर पडण्याचे काम आता चालू झाले आहे. यापूर्वी इतिहासामध्ये भारतीय संदर्भ आलेले नाहीत. यामध्ये आपला वैचारिक आळस दिसून येतो; पण आता चांगल्या अर्थाने इतिहास पालटण्याचे कार्य चालू झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘ओबीसी’तून आरक्षण न दिल्यास विधानसभेच्या सर्व जागा लढवू ! – मनोज जरांगे, मराठा समाज आंदोलनकर्ते

‘राज्य सरकारने १० टक्के दिलेले आरक्षण फसवे निघाले. याचा मराठा समाजाला लाभ झाला नसल्याने ४ जून या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे ‘बेमुदत उपोषणा’ला बसणार आहे

यवतमाळ येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्या !

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे नोंद होणार !

अनधिकृत शाळा चालूच होऊ नयेत यासाठी उपाययोजना होणे आवश्यक !

बांगलादेशातून भारतात आलेल्या ३ लाख रुपयांच्या नोटा बनावट !

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !

धाराशिवमध्ये पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा समाजाचे आंदोलन !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळले

शाळेत पहिल्याच दिवशी विनामूल्य पाठ्यपुस्तके मिळणार !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळा या शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतच विनामूल्य पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.

१८ मेपासून श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंती उत्सवास प्रारंभ ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

या निमित्ताने शुक्रवार पेठ येथील पीठात आठवडाभर प्रवचन, कीर्तन, गायन आणि देवी भागवत यांचे आयोजन केले आहे. त्याचसमवेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा पीठाच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे……

बीडमध्ये ‘कमळाला मतदान का केले ?’ याचा जाब विचारत कुटुंबावर तलवारीने आक्रमण !

पोलिसांचा धाक संपल्यानेच अशा प्रकारे गुंडगिरी, दादागिरी चालू आहे, असे म्हटल्यास नवल ते काय !

छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांच्या कॉपी प्रकरणाची सुनावणी चालू !

येथील इयत्ता १० वीच्या १४६, तर इयत्ता १२ वीच्या १९१ जणांची परीक्षेतील अपप्रकार प्रकरणी सुनावणीची दुसर्‍या टप्प्यातील प्रक्रिया होणार आहे. या सुनावणीस संधी देऊनही उपस्थित न राहिल्यास एकांगी निर्णय देण्यात येणार..