दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : घाटकोपर येथे होर्डिंगसाठी झाडांना दिले विषारी इंजेक्शन !; वादळामुळे नवी मुंबईत ३० हून अधिक झाडे उन्मळून पडली !…

घाटकोपर येथे होर्डिंगसाठी झाडांना दिले विषारी इंजेक्शन !

मुंबई – मुंबईतील घाटकोपर परिसरात मोठे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. हे होर्डिंग लावतांना आजूबाजूच्या झाडांना विषारी इंजेक्शन देऊन जाळण्यात आल्याचे समजते. महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाने डिसेंबर २०२३ मध्येच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या होर्डिंगची देखभाल आणि व्यवस्थापन करणारी एजन्सी ‘ईगो मिडिया’विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यात सुबाभूळ, पिंपळ आणि इतर वृक्ष अचानकच सुकून नष्ट झाल्याचे म्हटले होते.


वादळामुळे नवी मुंबईत ३० हून अधिक झाडे उन्मळून पडली !

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये १३ मे या दिवशी झालेल्या वादळी वार्‍यामुळे शहरात ३० हून अधिक झाडे उन्मळून पडली. ही झाडे काही ठिकाणी चारचाकी, तसेच अन्य वाहने यांवर पडून वित्तहानी झाली. सुदैवाने या कोणत्याही दुर्घटनेत जीवितहानी किंवा कुणीही घायाळ झाले नाही.


खोट्या मतदानाचा प्रयत्न करणारे ६ धर्मांध कह्यात !

छत्रपती संभाजीनगर – मतदान केल्यानंतर कपडे धुण्याचे ‘फॅब्रिक व्हाइटनर’ लावून बोटाची शाई पुसून पुन्हा मतदान करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ६ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले. शेख मोबीन जलील अहमद, सय्यद साजिद सय्यद साबेर, अनीस खान मसूद खान, सय्यद सलाउद्दीन शकूर सालार, तारेख बाबू खान, मुद्दसीर इम्रान खान अशी त्यांनी नावे आहेत.

संपादकीय भूमिका :

  • ‘असुरक्षित’ नव्हे, तर ‘सुरक्षित’ असणारे अल्पसंख्य धर्मांधच लोकशाहीतील मतदान प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास धजावतात !
  • अल्पसंख्यांक म्हणून सुविधा मिळवण्यात आघाडीत असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे ?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथे सभा !

कल्याण – लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त ५ व्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे या मतदारसंघात निवडणुका होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात पुष्कळ पालट केले आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सभास्थळी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जाहीर सभेसाठी १ लाखांच्या आसपास नागरिक येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सभास्थळाच्या आसपासच्या परिसरातील वाहतुकीत वाहतूक पोलिसांकडून मोठे पालट करण्यात आले आहेत. १४ मे या दिवशी रात्री १२ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत पालट लागू असतील.