सोनाली फोगाट यांच्या हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावे !

खाप पंचायतीच्या बैठकीनंतर सोनाली यांच्या मुलगीने गोवा पोलिसांच्या अन्वेषणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या आईची हत्या करण्यामागे सुधीर संगवानचा नेमका हेतू काय होता ? हे गोवा पोलिसांना अद्याप शोधून काढता आलेले नाही !

नूंह (हरियाणा) येथे खाण माफियांकडून पोलिसांवर आक्रमण : एक पोलीस घायाळ

येथे यापूर्वी खाण माफियांनी यांनी एका पोलीस उपअधीक्षकाला ठार केल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने पुन्हा अशी घटना घडली, हे लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असे भारतियांना वाटते !

गायी आणि म्हशी यांच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आमिद अली याला अटक

अशा घटनांतून या विशिष्ट समाजातील लोकांची विकृती दिसून येते. अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

गुरुग्राम (हरियाणा) येथील गोयंका विश्‍वविद्यालयातील खोलीमध्ये नमाजपठण करण्यात आल्यावरून वाद

गुरुग्राम येथील जी.डी. गोयंका विश्‍वविद्यालयाच्या एका खोलीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी त्याचा विरोध केला. याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले; मात्र कुणाकडूनही तक्रार न मिळाल्याने ते कारवाई न करता परत गेले.

‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारित करणार्‍या अभिनेत्रींविरुद्ध कारवाई करा !  

सध्या भारतात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टमध्ये गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत. ही कृत्ये समाजातील सर्वसामान्य स्त्रियांमध्ये लज्जा निर्माण होईल, अशी आहेत.

‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने फरिदाबाद (हरियाणा) येथील शाळेत ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन

या वेळी ‘शिक्षक आणि विद्यार्थी यांनी त्यांच्या जीवनाला अध्यात्माची जोड दिली, तर ते नेहमीसाठी आनंदी राहू शकतात’, असे मार्गदर्शन प्रतिष्ठानचे श्री. गुलशन किंगर यांनी केले.

फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने २ ठिकाणी वृक्षारोपण

सेक्टर २९ मधील हुडा मार्केटजवळच्या पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन’च्या सदस्यांनीही सहभाग घेतला. असोसिएशनचे महासचिव श्री. सुबोध नागपाल यांनी ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या उपक्रमाचे कौतुक केले.

हरियाणातील आमदारांना खंडणीसाठी धमकी देणार्‍या ६ सराईत गुन्हेगारांना अटक

आमदारांना खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी हरियाणा पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पोलिसांनी ६ जणांना अटक केली. राज्यातील ४ आमदारांना २४ ते २८ जून या कालावधीत दूरभाष करून धमकी देण्यात आली होती.

फरीदाबाद (हरियाणा) येथे क्षुल्लक कारणावरून शेजारी रहाणार्‍या धर्मांधांकडून हिंदु तरुणीला मारहाण

शेजारी धर्मांध असेल, तर काय स्थिती होते, हे लक्षात घेऊन हिंदूंना सतर्क रहाण्यास स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या !

फरीदाबाद (हरियाणा) येथे धर्मांध तरुणांकडून हिंदु तरुणाचा शिरच्छेद !

हिंदूंचा एका पाठोपाठ एक शिरच्छेद केला जात असतांना कुठलेही सरकार ते रोखू शकत नाही, हे लक्षात घ्या ! यासाठीच आता हिंदु राष्ट्राची स्थापना करा !