फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने २ ठिकाणी वृक्षारोपण

फरिदाबाद (हरियाणा) – ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने २८ अन् ३० जुलै या दिवशी वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण अनुक्रमे सेक्टर २८ मधील ‘गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल’ आणि सेक्टर २९ मधील हुडा मार्केटजवळच्या पार्कमध्ये करण्यात आले. गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूलमध्ये झालेल्या उपक्रमात अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्य रमा राणी आदी उपस्थित होते.

सेक्टर २९ मधील हुडा मार्केटजवळच्या पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन’च्या सदस्यांनीही सहभाग घेतला. असोसिएशनचे महासचिव श्री. सुबोध नागपाल यांनी ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या उपक्रमाचे कौतुक केले.