नूंह (हरियाणा) येथे खाण माफियांकडून पोलिसांवर आक्रमण : एक पोलीस घायाळ

नूंह (हरियाणा) – येथे खाण माफियांनी पोलिसांवर आक्रमण केले. यात एक पोलीस घायाळ झाला. काही आठवड्यापूर्वी येथे खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकांवर ट्रक चढवून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी ५ ओळखीचे, तर अन्य ४५ अनोळखी लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांना माहिती मिळाली होती की, राजस्थान आणि हरियाणा यांच्या सीमेवरील बडेर गावातील डोंगरावर अवैध उत्खनन चालू आहे. येथे मोठमोठी यंत्रे आणण्यात आली आहेत. पोलीस येथे पोचले असता त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. पोलिसांनी आता येथील यंत्रे जप्त केली आहेत. तसेच आरोपींच्या अटकेसाठी पथके स्थापन केली आहेत.

संपादकीय भूमिका

येथे यापूर्वी खाण माफियांनी यांनी एका पोलीस उपअधीक्षकाला ठार केल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने पुन्हा अशी घटना घडली, हे लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असे भारतियांना वाटते !