हरियाणातील आमदारांना खंडणीसाठी धमकी देणार्‍या ६ सराईत गुन्हेगारांना अटक

भोंडसी (हरियाणा) – आमदारांना खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी हरियाणा पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पोलिसांनी ६ जणांना अटक केली. राज्यातील ४ आमदारांना २४ ते २८ जून या कालावधीत दूरभाष करून धमकी देण्यात आली होती. पाकमधील १० जणांकडून धमकीचे दूरभाष करण्यात आले होते. अटक करणार्‍यांपैकी दुलेश आलम आणि बदरे आलम यांना मुंबईतून, तर अमित यादव, सादिक अनवर, सनोज कुमार आणि काश आलम यांना बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५५ ए.टी.एम्. कार्ड, २४ भ्रमणभाष संच, ५६ सिम कार्ड, २२ पासबूक आणि चेकबूक, ३ लाख ९७ सहस्र रुपये, एक चारचाकी गाडी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचा आतंकवादी संघटनांशी संबंध नाही. त्यांचे भारतासह पाकिस्तान आणि पश्‍चिम आशियातील काही देशांत साथीदार आहे.

संपादकीय भूमिका

गुन्हेगारांचे पाकिस्तानातही साथीदार !