मडगाव येथे नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने श्रीकृष्णपूजन आणि मिरवणूक
नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मडगाव येथे श्रीकृष्णपूजन आणि नंतर मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचा ५३ वा श्रीकृष्ण पालखी उत्सव होता.
नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मडगाव येथे श्रीकृष्णपूजन आणि नंतर मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचा ५३ वा श्रीकृष्ण पालखी उत्सव होता.
काणकोण तालुक्यात यासंबंधी बागायतदार बाजाराच्या दुकानावर, चावडी, चाररस्ता आदी ४ रहदारीच्या ठिकाणी लावण्यात आलेले ‘हलालमुक्त दिवाळी साजरी करूया’, हे फलक पाहून धर्माभिमान्यांनी समाधान व्यक्त करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
गोवा पोलिसांनी २९ ऑक्टोबर या दिवशी कामरखाजन, म्हापसा येथून गायीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचे सुमारे १५ ते २० डबे कह्यात घेतले आहेत. पोलिसांनी या वेळी चाकू आणि इतर हत्यारेही कह्यात घेतली आहेत.
मडगाव कदंब बसस्थानकावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून २ पिशव्यांमध्ये भरून आणलेला ३८ सहस्र ४०० रुपये किमतीचा जवळजवळ १२ किलो खवा जप्त करण्यात आला आणि तो नष्ट करण्यात आला.
वर्षानुवर्षे दिवाळीच्या पूर्वसंध्येला निघणार्या नरकासुर प्रतिमांच्या मिरवणुकांमुळे होणार्या गोंगाटामुळे आणि सहन न होणार्या संगीतामुळे वृद्ध अन् रुग्ण व्यक्तींना त्रास होतो. यावर्षी तरी त्याला आळा बसावा, अशी मागणी अनेकांकडून होत आहे.
गोवा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणे संबंधितांना सुलभ होते. या ठिकाणी ग्राहकसंख्याही अधिक असल्याने पैसेही चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे युवती याकडे आकर्षित होत असतात.
स्थानिकांचा विरोध असूनही हणजूण कोमुनिदादच्या २७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोमुनिदाद भूमीत ३ मोठ्या ‘इव्हेंट’चे (कार्यकमांचे) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आली.
येथील टेंग्से कुलोत्पन्न तर्करत्न श्री. दत्तानुभव उपाख्य राघव गुलाब टेंग्से यांनी वेदांत शास्त्रामध्ये संपूर्ण अद्वैतवेदांत शास्त्राची ‘तेनाली’ येथे महापरीक्षा देऊन २७ ऑक्टोबर या दिवशी ‘वेदांतरत्न’ ही उपाधी कांची पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्याकडून प्राप्त केली.
जे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही ?
पूजा सावंत यांनी सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवल्याचे प्रकरण