फोंडा येथे हिंदुत्वनिष्ठांच्या सभेला प्रखर हिंदुत्वनिष्ठ माधवी लता संबोधित करणार

‘हिंदू रक्षा समिती, फोंडा’ यांनी १९ डिसेंबरला सायंकाळी फोंडा येथील जुने बसस्थानक (इंदिरा मार्केट) येथे आयोजित केलेल्या भव्य सभेला प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा जिहादी मानसिकतेच्या विरोधात प्रखरपणे बोलणार्‍या माधवी लता संबोधित करणार आहेत

बोरी, फोंडा येथे २ टन गोमांस कह्यात

फोंडा पोलिसांनी बोरी पुलाजवळ धाड घालून एका वाहनातून अवैधपणे वाहतूक करण्यात येत असलेले सुमारे २ टन गोमांस कह्यात घेतले.

देवस्थान कायद्यात पालट करण्याचा तूर्तास विचार नाही ! – मंत्री बाबूश मोन्सेरात

मंदिरातील अधिकारावरून मंदिरातील महाजन आणि इतर समुदायांतील व्यक्ती यांच्यामधील वादाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच गावातील शांतीही बिघडत आहे.

कारखाने आणि हॉटेलचालक यांनी कचरा उघड्यावर टाकल्यास कठोर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

औद्योगिक कारखाने आणि हॉटेलचालक त्यांचा कचरा गावाच्या वेशीवर आणून टाकत आहेत. अशा प्रकारांत वाढ झालेली आहे आणि हे प्रकार त्वरित थांबवावे, अन्यथा सरकार संबंधितांची वीज आणि पाणी यांची जोडणी तोडणे अन् आस्थापनांना टाळे ठोकणे, अशी कठोर कारवाई करणार आहे.

पाकिस्तानात जन्मलेले शेन पेरेरा यांना ‘सी.ए.ए.’ अंतर्गत भारतीय नागरिकत्व बहाल

‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या (सी.ए.ए.च्या) अधिनियमाच्या अंतर्गत पाकिस्तानात जन्मलेले गोव्यातील रहिवासी शेन सेबॅस्टियन पेरेरा आणि त्यांचे कुटुंबीय यांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे.

भविष्यकाळात पर्यायी ऊर्जेकडे वळणे आवश्यक ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

भविष्यात औष्णिक ऊर्जेचा दीर्घकाळ वापर करणे शक्य नसल्याने इतर पर्यायी ऊर्जास्रोतांकडे वळणे आवश्यक आहे, असे वक्तव्य वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

सत्तरी तालुक्याच्या विकासाला सरकारकडून पूर्ण सहकार्य ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा

सत्तरीच्या विकासाला सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्यात आले असून यापुढेही सत्तरीतील विकासकामे गतीने होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

ध्वनीप्रदूषणासंबंधी अवमान याचिकेवरील सुनावणी १३ डिसेंबरपर्यंत स्थगित

पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीय असल्यानेच ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात लोकांना स्वखर्चाने न्यायालयीन लढा द्यावा लागतो !  

केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू

केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘आपला पेहराव संस्कृतीला धरून असावा’ ही संकल्पना मंदिरात लागू करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती जाधव आयोगाच्या अहवालात नावे असलेल्या नोटरींची सेवा बंद करणार ! – आलेक्स सिक्वेरा, कायदामंत्री, गोवा

नोटरींच्या सहभागाविना भूमी बळकावण्याचा घोटाळा होणे अशक्य आहे. भूमी बळकावल्याच्या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती जाधव आयोगाच्या अहवालात नावे असलेल्या नोटरींची सेवा बंद करण्यात येईल, अशी चेतावणी कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली आहे.