श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीच्या जत्रोत्सवाला थाटात प्रारंभ

१८ जानेवारीला सकाळी श्रींस महाअभिषेक झाला. रात्री विधीपूर्वक नमन, शिबिकोत्सव, पालखी, जागर आणि आरती प्रसाद होईल. १९ जानेवारीला रात्री श्रींची अंबारी रथातून मिरवणूक होईल. २० जानेवारीला रात्री जागर, शिबिकोत्सव, श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक आदी होईल.

‘‘ऑफलाईन’ परीक्षेला बसा अन्यथा घरी चला ! ’’

‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध करणार्‍या ‘एन्.एस्.यू.आय.’च्या विद्यार्थी सदस्यांना जी.व्ही.एम्. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची चेतावणी !

वर्ष १९७० चा काळ हिंदी चित्रपटासाठी सुवर्णकाळ ठरला ! – राहुल रवैल,चित्रपट निर्माते

‘५०, ६० आणि ७० च्या दशकांतील चित्रपटनिर्मिती’, या विषयावर आयोजित परिसंवादात चित्रपट निर्माते राहुल रवैल बोलत होते. या संवाद कार्यक्रमात ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने अनेक महनीय व्यक्तींनी सहभाग घेतला.

कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आणि श्री शांतादुर्गादेवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ न देण्यासाठी प्रयत्नरत रहाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन !

मगो पक्षाची नूतन केंद्रीय समिती घोषित

१७ जानेवारीला झालेल्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीत श्री. दीपक ढवळीकर ४०९ मतांनी विजयी ठरल्याने त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली.

५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पणजी (गोवा) येथे शानदार उद्घाटन

सर्व चित्रपट रसिक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आदी वाट पहात असलेल्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पणजी, गोवा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले.

साधनेमुळे भारतीय आणि पाश्चात्त्य संगीत यांचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण करणे शक्य ! – कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

साधना करत असलेल्या व्यक्तीची स्वतःची सूक्ष्म जाणण्याची क्षमता साधनेमुळे वाढते आणि ती भारतीय अन् पाश्चात्त्य संगीत यांचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण करू शकते.

देशभरासह गोव्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ

देशभरात कोविड लसीकरणाचा १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला. या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून ‘व्हर्च्युअल’ माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा मेळावलीवासियांचा निर्णय

आयआयटी प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या भूमीचा मालकीहक्क सरकारकडे आहे, तो मागे घेतल्याविना आणि ग्रामस्थांच्या विरोधातील पोलिसांत नोंद केलेले खटले मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, असा निर्णय मेळावलीच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

अयोध्येतील राममंदिरासाठीच्या निधीसमर्पण मोहिमेला पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरातून प्रारंभ

अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रावरील २.७ एकर भूमीत ५७ सहस्र ४०० चौरस फूट क्षेत्रामध्ये पुढील ३ वर्षांत भव्य अशा राममंदिराची उभारणी केली जात आहे. या अनुषंगाने उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्या अध्यक्षतेखाली गोवा समर्पण निधी समितीने गोव्यात निधी समर्पण मोहिमेला प्रारंभ केला आहे.