मी ४ ते ५ दिवसांत बरा होऊन घरी जाईन ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री

माझे आरोग्य आता सुधारत आहे.मला भेटण्यासाठी कुणीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येऊ नये. घरी गेल्यावर मी सर्वांना भेटेन, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

‘गोवा लोकायुक्तां’च्या नियुक्तीस उच्च न्यायालयाकडून आणखी २ मासांचा अवधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘गोवा लोकायुक्तां’चे रिक्त पद भरण्यासाठी गोवा शासनाला आणखी २ मासांचा अवधी दिला आहे.  

पालिका निवडणूक ३ मासांनी पुढे ढकलली

राज्य निवडणूक आयोगाने भारतीय घटनेचे कलम २४३ (के) आणि २४३ (झेड्. ए.) यांनुसार राज्यातील ११ नगरपालिका मंडळे, पणजी महानगरपालिका, ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक आणि नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघाची निवडणूक ३ मासांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार !  विश्‍वेश परब, युवा आंदोलक, मेळावली

भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार आहे, असे विधान मेळावली येथील आयआयटी विरोधातील युवा आंदोलक श्री. विश्‍वेश परब यांनी केले. ‘भारत माता की जय’ संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘मेळावली वाचवा लोकशाही वाचवा’, या विषयावर ते बोलत होते.

मडगाव येथील स्वामी विवेकानंद केंद्र खुले करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गोवा भेटीच्या वेळी भेट दिलेल्या मडगाव येथील ‘दामोदर साल’ या ठिकाणाला भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

शंखवाळी तीर्थक्षेत्री फेस्ताचे आयोजन करण्यास पुरातत्व खात्याचा मंत्री या नात्याने मी पूर्ण सहकार्य केले ! – गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांची माहिती

सेंट जोसेफ वाझ यांना मानणार्‍यांना पाठिंबा देणे सरकारमधील घटक या नात्याने माझे कर्तव्य होते. ख्रिस्ती धर्मात आर्चबिशप यांना सर्वांत मोठे स्थान आहे. या प्रकरणी आर्चबिशप यांच्या आज्ञेने प्रारंभीची २ वर्षे फेस्ताचे निर्विघ्नपणे आयोजन झाले, अशी माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नास्नोडकरीण देवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ देणार नाही !  आमदार मायकल लोबो

हा प्रकल्प या जागेतून रहित करून दुसर्‍या जागेत नेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया मी चालू करीन’, असे आश्‍वासन कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांनी १८ जानेवारीला येथे झालेल्या सभेच्या वेळी दिले.

मगोपचे माजी आमदार लवू मामलेदार ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ

मगो पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव घेऊन मगो पक्षाचे मुख्य सचिव आणि माजी आमदार लवू मामलेदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. यानुसार त्यांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून बाहेर ठेवण्यात येईल.

आयआयटी प्रकल्पासाठी नवीन भूमी शोधण्यासाठी तज्ञांचा गट नेमणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात आयआयटी प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकार सुमारे ४ ते ५ सदस्यांचा समावेश असलेला एक तज्ञांचा गट बनवणार आहे. या गटात शिक्षण तज्ञ, आयआयटी पदवीधर आदींचा समावेश असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.