श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीच्या जत्रोत्सवाला थाटात प्रारंभ

फोंडा, १८ जानेवारी (वार्ता.) – फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला सोमवारपासून थाटात प्रारंभ झाला. देवस्थान समितीचे अध्यक्ष नितीन देसाई यांनी जत्रोत्सवासंबंधी सविस्तर माहिती दिली. १८ जानेवारीला सकाळी श्रींस महाअभिषेक झाला. रात्री विधीपूर्वक नमन, शिबिकोत्सव, पालखी, जागर आणि आरती प्रसाद होईल.

१९ जानेवारीला रात्री श्रींची अंबारी रथातून मिरवणूक होईल. २० जानेवारीला रात्री जागर, शिबिकोत्सव, श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक आदी होईल. २० जानेवारीला रात्री श्रींची विजयरथातून मिरवणूक, २२ जानेवारीला रात्री जागर, शिबिकोत्सव, २३ जानेवारीला पहाटे ६ वाजता श्रींची महारथातून भव्य मिरवणूक होईल. प्रतिदिन सकाळी श्रींस महाभिषेक होईल आणि रात्री आरती होईल.