मडगाव, १९ जानेवारी (वार्ता.) – गांधीवादी विचारवंत, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, जुन्या काळातील पत्रकार, साहित्यिक आणि गोव्यातील ‘मार्ग’ चळवळीचे प्रवर्तक गुरुनाथ केळेकर यांचे १९ जानेवारी या दिवशी पहाटे निधन झाले. त्यांचे वय ९१ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवार, २० जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता मडगाव येथील हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुनाथ केळेकर यांच्या पश्चात पुत्र डॉ. समीर आणि विवाहित कन्या डॉ. चित्रा जुवारकर आणि डॉ. संजीवनी केणी, असा परिवार आहे.
गुरुनाथ केळेकर आणि सनातन संस्था
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गुरुनाथ केळेकर यांनी आरंभलेल्या विविध समजोपयोगी मोहिमांमध्ये सनातन संस्थेने वर्ष १९९९-२००० या काळात सक्रीय सहभाग घेतला होता. मडगाव येथील प्रसिद्ध दिंडी उत्सवात भरणार्या फेरीतील खाद्यपदार्थांवर आच्छादन घालणे, रस्त्यांची स्वच्छता करणे आदी मोहिमांमध्ये सनातन संस्थेने सहभाग घेतला होता. तसेच शासनातील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणारे कर्नाटक येथील डॉ. शानभाग यांच्या कार्यातही सनातन संस्थेने सहभाग घेतला होता. गुरुनाथ केळेकर यांनी डॉ. शानभाग यांना प्रथम सनातन संस्थेचा परिचय करून दिला.
सनातन परिवार केळेकर, जुवारकर आणि केणी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.