मारहाण प्रकरणी रमेश तवडकर निर्दोष

रमेश तवडकर

पणजी, १९ जानेवारी (वार्ता.) – भाजपचे नेते आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांना वर्ष २०१७ मधील मारहाण प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये काणकोण येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने मारहाण प्रकरणी रमेश तवडकर यांना दोषी ठरवून यांना पीडित पुनो वेळीप यांना १० सहस्र रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता. प्रथमश्रेणी न्यायालयाच्या आदेशाला रमेश तवडकर यांनी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.