फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ख्रिस्ती पाद्री अन् त्याच्या पत्नीला अटक

पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून पोलिसांनी शेफर्ड बुशिरी या पाद्य्राला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. हा पाद्री त्याच्या अनुयायांमध्ये ‘प्रेषित’ म्हणून प्रसिद्ध आहे.