फ्रान्सने हिंसाचारग्रस्त सुदानमधून भारतीय नागरिकांसह २८ देशांतील ३८८ लोकांना सुखरूप बाहेर काढले !

खारटूम (सुदान) – सुदानमध्ये सैन्यदल आणि निमलष्करी दल यांच्यात हिंसाचार चालूच असून त्यामध्ये अडकलेल्या लोकांना तेथून बाहेर काढण्यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. फ्रान्सने भारतीय नागरिकांसह २८ देशांतील ३८८ लोकांना हिंसाचारग्रस्त सुदानमधून सुखरूप बाहेर काढले आहे.

१. सुदान सध्या हिंसेच्या विळख्यात सापडला आहे. सुदानची राजधानी खारटूम येथे १५ एप्रिलपासून चालू झालेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. या हिंसाचारात आतापर्यंत २०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

२. सुदानमधील विमानतळ बंद आहेत, तरीही सुदानमधून आपापाल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी संबंधित देश प्रयत्नशील आहेत. सुदानमधील अमेरिकेचा दूतावास नुकताच रिकामा करण्यात आला आहे.