ट्युनिशियामध्ये मुसलमान मुलींना इतर धर्मांतील मुलांशी विवाह करण्याचा अधिकार

 

ट्युनिस – आफ्रिका खंडातील ट्युनिशिया या मुसलमानबहुल देशामध्ये मुसलमान मुलींना कायद्याने इतर धर्मांतील मुलांशी विवाह करण्याचा अधिकार आहे. ट्युनिशिया हा एक प्रगत आणि स्वतंत्र देश आहे, ज्याची ९९ टक्के लोकसंख्या मुसलमान आहे. हा देश जगातील सर्व इस्लामी देशांसाठी एक उदाहरण आहे; कारण येथील महिलांना संपूर्ण इस्लामिक जगतात सर्वाधिक स्वातंत्र्य आहे. जगातील इतर सर्व इस्लामी देशांमध्ये मुसलमान मुलीला दुसर्‍या धर्माच्या मुलाशी लग्न करायचे असेल, तर तिने आधी त्या मुलाला धर्मांतर करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले पाहिजे.

मौलवींकडून निषेध !

महिलांना कायद्याच्या माध्यमातून जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य देणार्‍या या  निर्णयाचा कट्टरपंथी आणि मुसलमान मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, सरकारचा हा निर्णय ट्युनिशियाला उर्वरित अरब जगापासून वेगळे करतो.