आताचा भारत प्रत्युत्तर देणारा देश आहे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

आजच्या भारताची धोरणे भारताबाहेरच्या लोकांच्या दबावाखालची नसतात. हा स्वतंत्र भारत आहे. भारत आता ‘तुम्ही कुणाकडून तेल विकत घ्या ? आणि कुणाकडून घेऊ नका ?’, हे त्याला सांगणार्‍या देशांच्या दबावाखाली रहात नाही.

गोव्यात सलग नवव्या दिवशी वनक्षेत्रांमध्ये आग कायम ८ ठिकाणी आग अजूनही सक्रीय

म्हादई अभयारण्य आणि सत्तरी वन क्षेत्रांतील बहुतांश आग आटोक्यात आली आहे; मात्र देरोडे येथील आग अजूनही धुमसत आहे. ही आग कर्नाटक राज्यात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

केनियामध्ये स्थानिक नागरिकांकडून चिनी व्यवसायिकांच्या विरोधात आंदोलन !

चीन ज्या देशात जातो, तेथील अर्थकारण स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करून त्या देशाची अर्थ व्यवस्था खिळखिळी करतो. केनियामध्ये हेच घडले आहे. भारतात हे घडण्याआधी सरकारने चिनी वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालावी !

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत भारतीय महिला सैनिकांची तुकडी तैनात

यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे.

पश्‍चिम आफ्रिकेतील सेनेगल देशात गर्भवती खासदाराच्या पोटात लाथ मारणार्‍या २ खासदारांना कारावास !

सेनेगल येथे गुंडांप्रमाणे वर्तन केलेल्या खासदारांना तात्काळ शिक्षा सुनावण्यात आली. भारतात कधी असे होणे शक्य आहे का ?

सोमालियन सैन्याच्या हवाई आक्रमणात १०० आतंकवादी ठार !

‘‘अल्-शबाब’च्या आतंकवाद्यांकडून सरकारी अधिकारी आणि सैनिक यांच्यावर मोठे आक्रमण केले जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर हवाई आक्रमण केले.

हिंदुद्वेषी पाकिस्‍तानी पत्रकार शरीफ याचा हत्‍येपूर्वी छळ

हिंदुद्वेष पसरवण्‍यासाठी कुख्‍यात पाकिस्‍तानी पत्रकार अरशद शरीफ याच्‍या हत्‍येनंतर या प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे.

केनियामध्ये बालाजी टेलिफिल्मचे माजी कार्यकारी अधिकारी आणि अन्य एका भारतियाची हत्या

केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रूटो यांचे सहकारी डेनिस इटुम्बी यांनी या संदर्भात दिलेल्या अहवालात म्हटले आहे, ‘दोन्ही भारतियांची केनियाच्या ‘किलर’ (गुप्तचर पोलिसांना तेथे ‘किलर पोलीस’ म्हटले जाते) पोलिसांनी हत्या केली.’

इजिप्तमध्ये सापडले ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वीचे सूर्यमंदिर !

इजिप्तच्या पुरातत्व विभागाने येथील अबुसीर भागात एक प्राचीन सूर्यमंदिर शोधून काढले आहे. हे मंदिर अनुमाने ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वींचे असल्याचा दावा केला जात आहे.