मंदिरांच्या संदर्भात अन्य पंथियांनी केलेले अपप्रकार, त्यांचे दुष्परिणाम आणि अपप्रकार करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

‘विदेशात आणि भारतात अनेक ठिकाणी प्राचीन मंदिरे नष्ट करून तेथे अन्य पंथीय त्यांची प्रार्थनास्थळे बांधतात. अन्य पंथीय लोक हिंदूंच्या अनेक देवतांची मंदिरे पूर्णपणे उद्ध्वस्त न करता तेथे नवीन बांधकाम करून प्रार्थनास्थळे बनवतात, तर काही वेळा मंदिरे पाडून त्यांची जागा पूर्णपणे कह्यात घेऊन तेथे नवीन बांधकाम करून प्रार्थनास्थळे बांधतात. ‘मंदिरांच्या संदर्भात अन्य पंथियांनी केलेले अपप्रकार आणि त्यांचे दुष्परिणाम’ यांच्या संदर्भात सनातन संस्थेचे साधक श्री. संजय मुळ्ये (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६४ वर्षे) यांनी विचारलेल्या प्रश्नांना देवाने मला दिलेल्या ज्ञानमय उत्तरांतून अशा घटनांमागील उलगडलेला आध्यात्मिक कार्यकारणभाव येथे लेखबद्ध केला आहे.                                              (भाग २)

या लेखातील भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/891104.html

४. भ्रष्ट झालेल्या मंदिरांच्या ठिकाणी अन्य पंथियांची प्रार्थनास्थळे निर्माण झाल्यामुळे हिंदु समाजाची होणारी हानी

प्रश्न : भ्रष्ट झालेल्या मंदिरांच्या ठिकाणी अन्य पंथियांची प्रार्थनास्थळे निर्माण झाल्यामुळे हिंदु समाजाची कोणती आणि किती हानी होते ?

उत्तर : भ्रष्ट झालेल्या मंदिरांच्या ठिकाणी अन्य पंथियांची प्रार्थनास्थळे निर्माण झाल्यामुळे हिंदु समाजाची पुढील प्रकारे हानी होते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

अ. धार्मिक कार्य (उत्सव किंवा यज्ञ) एकत्रितपणे करण्याचे ठिकाण नष्ट झाल्याने हिंदूंचे संघटन होण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हिंदु समाज विखुरला जाऊन हिंदूंच्या मनोबळाचे खच्चीकरण होते. त्यामुळे त्यांना अन्य पंथीय राजांचे किंवा नास्तिकांचे दास्यत्व स्वीकारावे लागते.

आ. हिंदु समाजाला मंदिरांच्या माध्यमातून धर्माचरण आणि साधना करण्यासाठी मिळणारे मार्गदर्शन थांबते. त्यामुळे हिंदूंचा धर्माभिमान न्यून होतो आणि त्यांची साधना न्यून होते. हिंदूंचे एकवटलेले धर्मबळ क्षीण होते. हिंदू त्यांच्या धर्मावर होणार्‍या आघातांना तोंड देऊ शकत नाहीत. त्यामुळे पुष्कळ प्रमाणात धर्महानी होते, उदा. मंदिर पाडल्यानंतर सामूहिक स्तरावर गोहत्या होणे, हिंदूंच्या महिलांचे अपहरण होणे, हिंदूंची कत्तल होणे यांसारख्या धर्महानी या धर्माने दुर्बळ झालेला हिंदु समाज रोखू शकत नाही.

इ. पवित्र आणि सकारात्मक राहून समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य करण्याची हिंदूंची प्रेरणाच नष्ट होते.

ई. हिंदूंच्या विविध सात्त्विक कला, उदा. गायनकला, वादनकला, नृत्यकला, शिल्पकला इत्यादी लुप्त झाल्याने त्यांचा वारसा खंडित होतो.

अशा प्रकारे हिंदूंचे श्रद्धास्थान असणारी मंदिरे नष्ट किंवा भ्रष्ट झाल्यामुळे हिंदूंच्या मनातील श्रद्धा डळमळीत होते. त्यामुळे ते धर्माचरण आणि साधना यांच्यापासून वंचित होऊन बुद्धीप्रामाण्यवादी बनून नास्तिकतेकडे वळतात. त्यामुळे हिंदु समाजाची पुष्कळ प्रमाणात धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावर हानी होते.

५. उच्च देवतांची आणि कनिष्ठ देवतांची मंदिरे (उदा. ग्रामदेवता) भ्रष्ट केल्याने हिंदूंची होणारी हानी

बहुतांश वेळा उच्च देवता या निष्काम, म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष देणार्‍या आणि कनिष्ठ देवता या सकाम, म्हणजे विविध प्रकारच्या इच्छापूर्ती करण्याचे कार्य करत असतात. उच्च देवतांची आणि कनिष्ठ देवतांची मंदिरे यांच्यामध्ये पुढील भेद आहे.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२५)

या लेखातील भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/895342.html

संपादकीय भूमिका 

हिंदूंनो, हिंदु समाजाची होणारी धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावरील हानी रोखण्यासाठी मंदिरे भ्रष्ट होण्यापासून थांबवा !