Muslim Population In US : अमेरिकेत मुसलमानांची लोकसंख्या झाली दुप्पट !  

वॉशिंग्टन – अमेरिकेत मुसलमानांची लोकसंख्या दुप्पट झाल्याची माहिती ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे सर्वेक्षण ‘रिलिजस् लँडस्केप स्टडी’द्वारे केले गेले आहे. या सर्वेक्षणानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत धार्मिक श्रद्धेत घट झाली होती; परंतु वर्ष २०२० पासून ती स्थिर झाली आहे.

१. वर्ष २००७ मध्ये अमेरिकेतील मुसलमानांची लोकसंख्या ०.४ टक्के होती, जी २०१४ मध्ये ०.९ टक्केपर्यंत वाढली; परंतु २०२३-२४मध्ये ती १.२ टक्के झाली. याचाच अर्थ गेल्या १६-१७ वर्षांत अमेरिकेतील मुसलमानांची लोकसंख्या दुप्पट झाली आहे.

२. अमेरिकेत कुठल्याही धर्मावर विश्वास नसलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. अशा लोकांना ‘नन्स’ म्हणतात. नन्स म्हणजे नास्तिक. अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी २९ टक्के लोक या श्रेणीत मोडतात.

३. सध्या जगाची लोकसंख्या अनुमाने ८०० कोटी आहे. यापैकी २०० कोटी लोक इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचे अनुयायी आहेत. यातही मुलमानांची लोकसंख्या अंदाजे १५० कोटी असल्याचे सांगितले जाते.