मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील सैदपूर गावात मुसलमानांनी हिंदूंच्या विवाहाच्या वरातीवर आक्रमण केले. यात काही जण घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेवरून गावात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या वरातीमध्ये फोडण्यात येत असलेल्या फटक्यांमुळे मुसलमानाच्या लाकडाच्या ढिकार्यावर ठिणगी पडून त्याला आग लागली. यावरून मुसलमानांकडून वरातीत सहभागी लोकांशी वाद घातला. यानंतर हाणामारी झाली. मुसलमानांनी हिंदूंचा पाठलाग करत त्यांना काठ्यांनी मारहाण केली. विवाहासाठी पाहुणे म्हणून आलेले अमित यांना मुसलमानांनी घरातून ओढून नेले आणि अमानुष मारहाण केली. हिंसाचाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आक्रमणात १२ जण घायाळ झाले. गावकर्यांचे म्हणणे आहे की, आक्रमणात ३० ते ४० लोकांचा समावेश होता. पोलिसांनी १४ मुसलमानांच्या विरोधात, तर ५० अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस अधीक्षक आदित्य बन्सल यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि म्हणाले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही. गावातील लोकांना शांतता राखावी.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही धर्मांध मुसलमानांचे उद्दामपणा नष्ट झालेला नाही. अशांच्या विरोधात अजून कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे ! |