१. ‘छावा’ हा चित्रपट पाहून पोटदुखी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार !
‘छावा चित्रपट सहकुटुंब पाहून आल्यानंतर ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केले. त्यात ‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृतीनुसार करण्यात आली !’,असे विधान त्यांनी केले आहे. अशी खुळचट विधाने करून जातीजातींत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहेत. आज हिंदूूंनी महाराष्ट्रामध्ये सर्वसमावेशक सरकार निवडून दिल्यानंतर हिंदूंमध्ये फूट पाडून त्यांच्यात भांडणे लावण्याचा हा प्रकार आहे. ‘छावा’ हा हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक जात्यंधांनी ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येमागे ब्राह्मण होते’, असे भासवण्यासाठी विविध माध्यमांद्वारे प्रयत्न आरंभ केला आहे. ऐतिहासिक तथ्ये बाजूला सारून केवळ एका समाजाविषयी अन्य जातींमध्ये विद्वेष निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत आहे.

२. द्वेषाने कुणावरही मात करता येत नाही, हे लक्षात घ्या !
खरे तर मराठा हे लढवय्ये आणि राज्यकर्ते ! आज त्यांनी स्वाभिमान आणि स्वकर्तृत्व यांच्या बळावर पुढे येण्याची आवश्यकता असतांना ‘आज त्यांच्यामध्ये लाचारी निर्माण होऊन आरक्षण अन् इतरांविषयी द्वेष निर्माण करणे, या कुबड्यांच्या बळावर पुढे जाण्याची धडपड का चालू आहे ?’, हा मोठा प्रश्न आहे. एवढा न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण का आणि कसा झाला ?’, याचा त्या समाजाने विचार करायला हवा. त्यांचे नेते ‘त्यांना केवळ ब्राह्मणांचा द्वेष करायला शिकवून आणि मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळायला लावून काय साध्य करू पहात आहेत ?’, याचा मराठा विचारवंतांनी अभ्यास करायला हवा. द्वेष करून कुणीही सर्वांगीण उन्नती करून घेऊ शकत नाही. त्यासाठी सचोटी, कष्ट करण्याची सिद्धता, निरंतर प्रयत्न आणि संकटांवर मात करून पुढे जाण्याचे धैर्य लागते. द्वेषाच्या बळावर तुम्ही काही काळासाठी संपन्नता पदरी पाडून घ्याल; मात्र कालौघात ती नष्ट होण्याची वेळ येते.
३. हिंदूंनो, समाजाला झुंडीमध्ये परिवर्तित करू पहाणार्यांपासून सावध रहा !
छत्रपती संभाजी महाराज हे शस्त्र आणि शास्त्र दोन्हींतही पारंगत होते. त्यांचा आदर्श ठेवून जनतेला विद्यासंपन्न आणि बलसंपन्न बनवून सुराज्य देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी केवळ जातीजातींत द्वेषाचे विष कालवून तात्पुरता लाभ रोहित पवारांसारखे नेते घेत आहेत. त्यांची संपूर्ण समाजाला एकसंधपणे पुढे नेऊन देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याची आकांक्षा नसून केवळ संधीसाधूपणा आहे. ‘झुंडीला अक्कल नसते’, या अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. रोहित पवारांसारखे अदूरदर्शी नेते ब्राह्मणद्वेष पसरवून समाजाला झुंडीमध्ये परिवर्तित करू इच्छित आहेत का ? तसे झाल्यास भारताची शकले होण्यास वेळ लागणार नाही. समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा मागमूसही शिल्लक राहिलेला दिसणार नाही.
४. हिंदूंनो सावधान !
हिंदूंनो सावधान ! वेळीच जागे व्हा ! ‘एक आहात, तर सुरक्षित आहात’ (एक है तो सेफ है ।) आणि ‘विखुरलात, तर नष्ट व्हाल’ (बटेंगे तो कटेंगे) या घोषवाक्यांची पावलोपावली आवश्यकता आहे, हे रोहित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. त्यामुळे अशांची दुकाने कायमस्वरूपी बंद होतील, असा धडा त्यांना मतपेटीद्वारे शिकवा !’
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२५)