झाल्या ज्योतीताई ‘ज्योती’स्वरूप ।

पू. (सौ.) ज्योती ढवळीकर

‘२४.२.२०२५ या दिवशी ‘पू. (सौ.) ज्योती ढवळीकर संतपदी विराजमान झाल्या’, ही आनंदवार्ता आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील फलकावर वाचली. तेव्हा आम्हाला पुढील कविता सुचली.

श्री. घनश्याम गावडे आणि सौ. राधा गावडे

गुरुचरणी मिळवला मोक्ष, घेऊनी तुम्ही गरुडझेप ।
झाल्या ज्योतीताई (टीप) ‘ज्योती’ स्वरूप ।। १ ।।

प्रगटले तुमच्या ठायी गुरुदेव ।
बघून तुमचा शरणागतभाव ।। २ ।।

कृतीतूनही शिकवले तुम्ही आम्हाला ।
आध्यात्मिक भावाने गुरुदेवांचे मन जिंकायला ।। ३ ।।

गुरुदेव आहेत आपले थोर ।
असे संत अनुभवण्या मिळती, आमचे भाग्य थोर ।। ४ ।।

टीप – पू. (सौ.) ज्योती ढवळीकर (सनातनच्या १३२ व्या संत, वय ६२ वर्षे)

– श्री. घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५१ वर्षे) आणि सौ. राधा घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक