पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘पू. (श्रीमती) निर्मला दाते (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये सौ. प्राची मसुरकर या एका शिबिराच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्या पू. दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी
सौ. प्राची मसुरकर

१. ‘मी त्यांच्या खोलीत जात असतांना दार उघडल्यावर मला वेगळाच सुगंध आला.

२. पू. आजींच्या चेहर्‍यावर माझी दृष्टी खिळून राहिली होती. मला ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटत होते.

३. मला पू. दातेआजींची खोली विशाल वाटत होती.

४. मी त्यांच्या खोलीत असेपर्यंत ‘पू. आजींच्या चरणांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवत होते. त्या जणू ‘मला चैतन्य देत आहेत’, असे मला वाटत होते.

५. माझे मन निर्विचार झाले होते.

६. सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे, पू. दातेआजींची मोठी सून) मला पू. आजींच्या संदर्भातील सूत्रे सांगत होत्या. तेव्हा मला त्यांच्या खोलीमध्ये शांती अनुभवता येत होती.

७. मी पू. दातेआजींच्या चरणी ‘तुम्ही जसे प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) सर्वस्व अर्पण केलेत, तसे मलाही गुरुदेवांच्या चरणी सर्वस्व अर्पण करण्यासाठी बळ द्या’, अशी प्रार्थना केली.

८. मला ‘त्यांच्या खोलीतून बाहेर यावे’, असे वाटत नव्हते.’

– सौ. प्राची मसुरकर (वय ६३ वर्षे), वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश. (२.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक