Gaza Ceasefire : रमझानच्या काळात गाझामध्ये इस्रायलकडून युद्धविराम

गाझामधील विध्वंस

जेरुसलेम (इस्रायल) – गेल्या दीड वर्षात इस्रायलने आतंकवाद्यांचा गड असणार्‍या गाझामध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणला आहे. लाखो लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. लोकांना तंबूत रहावे लागत आहे. इस्रायलने ‘रमझान’च्या निमित्त तात्पुरती युद्धबंदीची घोषणा केली आहे.