श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलीदानमासला प्रारंभ

धर्मकर्तव्य आणि राष्ट्रकर्तव्य म्हणून बलीदानमासात सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन कृष्ण अमावास्या (२८ फेब्रुवारी ते २९ मार्च २०२५) या कालावधीत या बलीदानमासचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर बलीदानमास हा प्रत्येक हिंदूने कडव्या निष्ठेने पाळला पाहीजे. ते आपले धर्मकर्तव्य आणि राष्ट्रकर्तव्य आहे. हिंदूंचे दुसरे छत्रपती स्वधर्म रक्षणासाठी ३० दिवस धीरोदात्तपणे अनंत यातना सहन करत मृत्यूशी झुंजले. त्यांच्या या दाहक बलीदानाचे स्मरण प्रत्येक हिंदूला झाले पाहिजे. आपण हिंदुस्थानच्या छत्रपतींचे एवढे धीरोदात्त बलिदान विसरलो; म्हणून आत्ता पाशवी वृत्ती वाढल्या आहेत. त्यांना रोखायचे असेल, तर प्रखरपणे आणि अगदी निष्ठेने धर्मवीर बलीदानमास पाळलाच पाहिजे.

धर्मरक्षणाची आग प्रत्येक हिंदूमध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच आपण विश्वाच्या या संघर्षात हिंदु म्हणून टिकू शकतो. त्यामुळे या बलीदानमासाच्या कालावधीत नियमितपणे मारुति मंदिर सर्कल येथे सायंकाळी ७.५० वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी देवेंद्र झापडेकर (७०२००२४२४२) आणि समीर सावंत (९८९२२४३७२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.