राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे विधान

झुंझुनू (राजस्थान) – जे हिंदू घाबरले होते ते आता इतर धर्मात आहेत. ज्यांना भीती वाटली नाही, ते अजूनही हिंदु आहेत, असे विधान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना केले. ते बलवंतपुरा येथील डुंडलोड कन्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
राज्यपाल बागडे यांनी कार्यक्रमात मांडलेली सूत्रे –
हिंदु संघटनेत सहभागी झाले म्हणून हिंदूंना लक्ष्य केले, तर प्रत्युत्तर देऊ !
अजमेरच्या विजयनगरमध्ये अल्पवयीन हिंदु मुलींना मुसलमान तरुणांनी जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी राज्यपाल बागडे शाळेच्या कार्यक्रमात म्हणाले की, पीडित मुली हिंदु संघटनांशी संबंधित होत्या. म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आले, अशा बातम्या येत आहेत; पण मी सांगू इच्छितो की, हिंदु संघटनेत सहभागी होणे हे पाप नाही. जर लोक कोणत्याही हिंदु संघटनेत सहभागी झाले, तर त्यांना लक्ष्य केले जाईल; म्हणून आम्ही गप्प बसणार नाही आणि समोरच्या लोकांनाही जाणूनबुजून लक्ष्य करू, अशी चेतावणी त्यांनी दिली.
भगव्या रंगावर आक्षेप घेणार्यांनी विचार पालटावेत !
राजस्थान विरांची भूमी आहे. जर कुणाला भगव्या रंगावर आक्षेप असेल, तर त्याने स्वतःचे विचार पालटले पाहिजेत. भारतात, भगवा रंग शक्ती, त्याग, संस्कृती, शौर्य आणि धर्म यांचे प्रतीक आहे.
वाकड्या दृष्टीने पहाणार्यांना धडा शिकवा !
सर्व मुलींनी धाडसी होणे आवश्यक आहे. आपणही काही कमी नाही. आमच्याकडे वाकड्या नजरेने पहाणार्या डोळ्यांत डोळे घालून कठोर संदेश द्या. त्याला सांगा की, त्याची नजर वाकडी आहे, आम्ही ती सहन करणार नाही. आम्ही त्याचे उत्तर देऊ. ‘आम्ही विटेचे उत्तर दगडाने देऊ’, असे मुलींनी सांगायला हवे. मुलींकडे इतकी शक्ती असायला हवी.
कौशल्य विकसित करा !
देशात प्रतिवर्षी १५ लाख तरुण अभियंते बनत आहेत; पण त्यांपैकी फक्त १ टक्के तरुणांना चांगल्या नोकर्या मिळू शकतात; कारण त्यांनी पदवीसमवेतच कौशल्ये विकसित केली आहेत. प्रत्येक क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला प्रतिभेकडे लक्ष द्यावे लागेल.
संपादकीय भूमिकाजे अन्य धर्मांत गेलेले हिंदू आहेत, त्यांना परत हिंदु धर्मांत आणण्यासाठी केंद्र आणि भाजप शासित राज्यांनी प्रयत्न केले पाहिजेत ! छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरणाचे महत्त्व दाखवून दिले आहेच. त्यावर वाटचाल करण्याची आता वेळ आली आहे ! |