१ जण ठार, तर पोलिसांसह काही जण घायाळ
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सच्या मुलहाऊस शहरात निदर्शनाच्या वेळी ‘अल्लाहू अकबर’ (अल्लाहू अकबर म्हणजे अल्ला महान आहे) अशा घोषणा देत एका व्यक्तीने अनेकांवर चाकूने वार केले. यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण घायाळ झाले आहेत. यात २ पोलीस अधिकारी गंभीररित्या घायाळ झाले, तर इतर तिघे किरकोळ घायाळ झाले. आक्रमणानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि इस्लामी आतंकवाद्याला कह्यात घेतले. तो अल्जेरियाचा आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याला ‘इस्लामी आतंकवादी आक्रमण’ म्हटले आहे. ‘आमचे सरकार फ्रेंच भूमीतून आतंकवादाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटीबद्ध आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.
१. घटनेच्या वेळी आक्रमणकर्ता पोलीस अधिकार्यांना लक्ष्य करत होता. पोलीस अधिकार्यांना वाचवण्यासाठी एक ६९ वर्षीय पोर्तुगीज नागरिक पुढे आला; परंतु आक्रमणकर्त्याने त्याच्यावर चाकूने वार केले. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
२. आक्रमणकर्ता आधीच फ्रान्सच्या आतंकवादी सूचीमध्ये होता. वर्ष २०१५ मध्ये शार्ली हेब्दो कार्यालय आणि एक ज्यू सुपरमार्केट यांवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर निरीक्षणासाठी संशयित इस्लामी आतंकवाद्यांची ही सूची सिद्ध करण्यात आली होती.
३. या आक्रमणकर्त्याला यापूर्वी आतंकवादी कृत्य किंवा गटाला पाठिंबा देण्याशी संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. त्याला अल्जेरियाला पाठवले जात होते; परंतु त्याच्या देशाने आतापर्यंत १० वेळा त्याला स्वीकारण्यास नकार दिला. इस्लामी आतंकवादामागील कारण स्थलांतराची समस्या आहे.
संपादकीय भूमिकायुरोपमध्ये सर्वाधिक मुसलमान फ्रान्समध्ये असल्याने फ्रान्समध्येच जिहादी आक्रमणे किंवा दंगली अधिक होतांना दिसतात. आता पाश्चात्त्य देशांनी जिहादी आतंकवादाला जगभरातून नष्ट करण्यासाठी संघटित होणे आवश्यक झाले आहे ! |