हिंदूंनी विरोध करून आणि पोलिसांनी अनुमती नाकारूनही साजरा केला उरूस

राजापूर – शहरातील मासळी बाजाराजवळ चिंचबांध येथे असलेल्या सूर्यमंदिर परिसरात उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदी आदेश असल्याचे सांगून नाकारली होती. असे असतांनाही १९ फेब्रुवारी या दिवशी येथे उरूस साजरा केल्याच्या प्रकरणी राजापूर पोलिसांनी ५० मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
राजापूर शहरातील मासळी बाजाराजवळ असलेली ऐतिहासिक वास्तू हे पुरातन सूर्यमंदिर आहे. या ठिकाणी मुसलमान समाजातील काही व्यक्तींनी अतिक्रमण केले असून १९ फेब्रुवारी या दिवशी या ठिकाणी उरूस साजरा करण्यात यावा, यासाठी अनुमती मागण्यात आल्याचे येथील हिंदूंना समजल्यावर हिंदूंनी ‘येथे उरूस साजरा करण्यास अनुमती दिली, तर हिंदू महाआरती करतील’, अशी चेतावणी एका निवेदनाद्वारे पोलिसांना दिली होती.
अल्ताफ कासम बारगीर (बाजारपेठ, राजापूर) यांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे अनुमती मागितली होती; मात्र पोलिसांनी ती नाकारली आणि तसे पत्र बारगीर यांना दिले होते. असे असतांनाही अल्ताफ कासम बारगीर आणि त्यांचे सहकारी मन्सुर काझी, सुलतान ठाकुर यांच्यासह अन्य ५० ते ६० जणांनी या आदेशाचा भंग करून उरूस साजरा केला. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अनिल लक्ष्मण केसकर यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांवर कारवाई केली.
संपादकीय भूमिकायावरून धर्मांध मुसलमान हे पोलीस, कायदा, सरकार आदी कुणालाही जुमानत नसल्याचे सिद्ध होते ! अशा कायदाद्रोही मुसलमानांविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी गप्प का ? |