रत्नागिरी येथील श्री. अजय शेट्ये यांनी पाठवलेले पत्र मला ‘२८.५.२०२३ या दिवशी मिळाले. त्यातील मजकूर पुढे दिला आहे.

श्री. राम,
आपल्याकडून या पत्राचे उत्तर लवकरात लवकर मिळावे, ही विनंती ! आपल्याकडे येण्याचे कष्ट करत आहे. बहुधा वेळ मिळाला, तर गोवा पहाण्याची शक्ती येवो, ही गुरुचरणी प्रार्थना आहे.

आपण आपले कार्य महान करावे. डॉ. आठवले गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचे कार्य तत्त्वनिष्ठ राहून साधकापर्यंत पोचवून त्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यांना प्रेमभावाने जोडावे. असाच प्रेमभाव वृद्धींगत करून आमच्या गोवा आणि महाराष्ट्र यांना द़ेशाच्या उच्च शिखरावर न्यावे, ही विनंती. कृपया पत्रव्यवहार करावा. आपल्या उत्तराची मी आतुरतेने वाट पहात आहे.
श्री. अजय शेट्ये
गणेश भवन, वीर सावरकर पेठ, रत्नागिरी.
(पत्र लिहिल्याचा दिनांक – ४.५.२०२३)
वरील पत्राची वैशिष्ट्ये
१. ‘माझी श्री. शेट्ये यांच्याशी ओळख नाही; म्हणून मी रत्नागिरी येथील साधकांना याविषयी विचारले. त्यांनी याविषयी चौकशी केली आणि मला म्हणाले, ‘‘ही व्यक्ती आपल्या ओळखीची नाही. समाजात आपले अनेक कार्यक्रम होतात. त्यांपैकी ते कुणी आपले हितचिंतक असू शकतात.’’
२. माझ्या जीवनात समष्टी साधनेच्या संदर्भात प्रथमच मला कुणीतरी पत्र पाठवले आहे. हे पत्र परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी समर्पित करत आहे.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)