बेवार (राजस्थान) येथील घटना

जयपूर (राजस्थान) – राजस्थानातील बेवार जिल्ह्यात मुसलमान तरुणांनी अल्पवयीन हिंदु मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करण्यासह त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. आरोपी रिहान महंमद, सोहेल अन्सारी, लुकमान, अरमान पठाण आणि साहिल कुरेशी हे १९ ते २० वर्षे या वयोगटातील आहेत, तर अन्य २ मुले अल्पवयीन आहेत.
अधिवक्त्यांनी आरोपींना चोपले !
न्यायालयाने ५ प्रौढ आरोपींना ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. या आरोपींना न्यायालयात उपस्थित केले जात असतांना अधिवक्त्यांनी त्यांना चोपले. त्यांच्यावर बूट आणि चप्पल फेकले. येथील हिंदु समुदायानेही या प्रकरणात निदर्शने केली आहेत. दोन्ही अल्पवयीन मुलांना बालगुन्हेगार मंडळाकडे पाठवण्यात आले आहे.
१. पोलिसांनी सांगितले की, ५ मुलींनी तक्रार केली आहे की, काही लोकांनी त्यांना भ्रमणभाष संच दिले आणि त्यांचे लैंगिक शोषण केले. या आरोपींनी सामाजिक माध्यमांद्वारे मुलींशी संपर्क साधला होता आणि त्यांना बोलण्यासाठी चिनी भ्रमणभाष दिले होते. या मुलींना ब्लॅकमेल केले जात होते आणि धर्मांतर करण्यास भाग पाडले जात होते.

२. आरोपी मुसलमान तरुणांपैकी काही जण वेल्डरच्या दुकानात काम करतात, तर काही फर्निचरच्या दुकानात कामगार म्हणून काम करतात. त्यांचे लक्ष्य शाळेत शिकणार्या दहावीच्या हिंदु विद्यार्थिनी होत्या. पीडित मुलीही जवळच्या परिसरात रहातात आणि या मुसलमान मुलांच्या परिसरातून शाळेत जात असत.
३. एका पीडितेने सांगितले की, सोहेल मन्सूरी १५ दिवस शाळेपासून घरी पोचेपर्यंत तिचा पाठलाग करत होता. त्याने त्याचा भ्रमणभाष क्रमांक मुलीला दिला. यानंतर एके दिवशी मुलीने त्याला संपर्क केल्यावर त्याने तिला एका कॅफेमध्ये भेटायला सांगितले आणि तिथे तिचे शारीरिक शोषण केले. याचे छायाचित्रही काढण्यात आले. सोहेल मन्सूरी समवेत इतर मुसलमान मुलेही होती. यानंतर सोहेलने तिच्या मैत्रिणीशी बोलण्यासाठी तिला छळण्यास चालू केले.
संपादकीय भूमिकाराजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! आता या आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा आणि राज्यात धर्मांधांवर वचक निर्माण करावा ! |