Sheikh Hasina Warns : बांगलादेशातील युनूस यांचे ‘आतंकवाद्यांचे सरकार’ पाडू !

शेख हसीना यांची चेतावणी !

नवी देहली – महंमस युनूस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व अन्वेषण समित्या विसर्जित केल्या आहेत. त्यानंतर आतंकवाद्यांना जनतेला मारण्यासाठी कारागृहातून मोकळे सोडले आहे. ते बांगलादेश नष्ट करत आहेत. आम्ही आतंकवाद्यांचे हे सरकार पाडू, अशी चेतावणी बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारला दिली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात ८०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यात पोलीस कर्मचार्‍यांचाही समावेश होता. शेख हसीन यांनी मृत ५ पोलिसांच्या पत्नी आणि त्यांची मुले यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. त्या वेळी त्या बोलत होत्या.

मी बांगलादेशात परत येईन !

शेख हसीना यांनी म्हटले की, मी बंगलादेशात परत येईन. आमच्या पोलिसांच्या झालेल्या हत्येचा सूड घेईन.

युनिस यांनी त्यांच्या अंतरिम सरकारमध्ये एका विद्यार्थी नेत्याचा समावेश केला आहे. तो म्हणतो, ‘पोलिसांना मारल्याखेरीज आंदोलन होऊ शकत नाही’; परंतु विश्वास ठेवा मला ही अराजकता संपवायची आहे. त्या ठिकाणी असलेला आतंकवाद संपवायचा आहे. मी पूर्वीप्रमाणेच सर्वांना न्याय देईन. मी तुम्हाला वचन देते.