परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात ‘स्वभावदोष दूर होण्यासाठी दीर्घकाळ लागणार आहे’, असे एका साधकाला सांगणे आणि त्यामागील कार्यकारण भाव साधकाला समजणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २००४ मध्ये मिरज येथील सनातनच्या आश्रमात सत्संगात एका साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘माझे स्वभावदोष दूर होण्यासाठी किती वर्षे लागतील ?’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आजपासून नियमित प्रयत्न केल्यास २५ वर्षे लागतील !’’

श्री. राम होनप

त्या वेळी मी साधनेत नवीन असल्याने माझ्या मनात प्रश्न आले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी असे उत्तर का दिले ? स्वभावदोष दूर होण्यासाठी इतकी वर्षे का लागतात ?’ त्यानंतर मी हा विषय विसरून गेलो.

आता हा प्रसंग आठवल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘प्रत्येक साधकावर अनेक जन्मांतील स्वभावदोषांचे अल्प-अधिक ओझे असते. त्या तुलनेत त्या साधकाचे हे ओझे २५ वर्षांत दूर होणार आहे, म्हणजे फारसा काहीच काळ नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वभावदोष दूर करण्यासाठी सुलभ पद्धती शिकवल्या. त्यामुळे ‘साधकांच्या अनेक जन्मांतील स्वभावदोषांचे ओझे न्यून होऊन त्यांचे जीवन आनंदी आहे, हे साध्य होत आहे’, याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२५)