परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका सत्संगात साधकाला केलेले अमूल्य मार्गदर्शन !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २००३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी ठिकठिकाणी जाऊन घेतलेल्या सत्संगांत जिल्ह्यांतर्गत दायित्व असलेल्या साधकांकडून झालेल्या चुका दाखवून दिल्या होत्या.  या प्रक्रियेनंतर अनेक साधकांना व्यष्टी साधना करण्यास सांगण्यात आले होते, तसेच या कालावधीत काही साधकांच्या मनात प्रश्न होते. साधकांची नकारात्मक स्थिती किंवा अन्य कारणे यांमुळे क्रियाशील साधकांची संख्याही न्यून झाली होती. वर्ष २००४ जानेवारीमध्ये झालेल्या प.पू. डॉक्टरांच्या एका सत्संगात एका साधकाने साधकांच्या दृष्टीने पुढील प्रश्न प.पू. डॉक्टरांना विचारला होता.

सनातनच्या साधकांकडे पाहिल्यावरही अन्य व्यक्तींचे नामस्मरण चालू व्हायला हवे !

कु. मेघा चव्हाण

प्रश्न : बरेच साधक सध्या क्रियाशील नाहीत. साधकांची साधनेत घसरण होत आहे. त्यावर उपाय काय ?

प.पू. डॉक्टर : २५ सहस्र मध्यम साधक असण्यापेक्षा ५०० चांगले साधक असले, तरीही त्यांच्यासाठी देवता येणार आहेत, तसेच या चांगल्या ५०० साधकांमुळे आणखी साधक सिद्ध होऊ शकतात. सनातनचे साधक चांगलेच असायला हवेत. त्यांच्याकडे नुसते पाहिले, तरीही अन्यांचे नामस्मरण चालू व्हायला हवे.’

एका जुन्या वहीमध्ये लिहिलेली परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सत्संगात सांगितलेली सूत्रे वाचतांना ‘वरील संवाद आताच्या स्थितीला धरून आहे’, असे मला वाटले. ‘२० वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले आजही लागू होते’, असे मला वाटते.

– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२५)