थोडक्यात महत्त्वाचे !

तरुणीची छेड काढणारा धर्मांध अटकेत !

ठाणे – येथे चालत जाणार्‍या २३ वर्षीय तरुणीची २० वर्षीय रिक्शाचालक साहील तय्यब पठाण याने रस्त्यात अडवून छेड काढली. तिने याविषयी खडसावल्यावर त्याने पुन्हा तिची छेड काढून तिला अश्लील शिवीगाळ केली. पीडितेच्या वडिलांनी विरोध केल्यावर साहीलने त्यांच्यावर आक्रमण केले. या प्रकरणी साहीलला अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका : वासनांध धर्मांध !


गूगलचे कार्यालय ‘बीकेसी’तच !

मुंबई – मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (‘बीकेसी’) गूगल कार्यालयाची जागा पालटली जाणार नाही. ते त्याच ठिकाणी असणार आहे. पुढील ५ वर्षांसाठी गूगलने बीकेसीमधील कार्यालयाच्या कराराचे नूतनीकरण केले आहे. बीकेसी-वरळी मेट्रो कॉरिडोर काही दिवसांत चालू होणार असतांना गूगलने हा निर्णय घेतला आहे.


धारावीचे सर्वेक्षण पूर्ण

मुंबई – धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नुकतेच तेथील ५० सहस्रांहून अधिक घरांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

संपादकीय भूमिका : धारावीतील बांगलादेशी घुसखोर तातडीने शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा धारावीत त्यांना अधिकृत घरे मिळतील !


लाचखोर मंडळ अधिकारी अटकेत !

कर्जत – कर्जत तालुक्यातील महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना १५ सहस्र रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. नेरळजवळील जिते येथील भूमीच्या नोंदीसाठी त्यांनी पैशाची मागणी केली होती.

संपादकीय भूमिका : भ्रष्टाचारग्रस्त महाराष्ट्र !


चारचाकीची काच फोडून वस्तूंची चोरी !

पनवेल – चारचाकीची काच फोडून मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली. भोकरपाडा येथे राजीवकुमार श्रीवास्तव यांनी चारचाकी ठेवली होती. चोराने काच फोडून पैसे, पासबुक, भ्रमणभाष, कागदपत्रे असा ३२ सहस्र रुपये किमतीचा ऐवज चोरला.


माकडांचा उच्छाद !

पाली (जिल्हा रायगड) – येथे माकडांनी उच्छाद मांडला आहे. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ठाकरे गटाचे पाली शहर प्रमुख विद्येश आचार्य यांनी केली. ही माकडे घरांचे पत्रे आणि छते फोडतात. मलःनिस्सारण वाहिन्या, विजेच्या तारा, कुंड्या, झाडे यांची पुष्कळ हानी करतात.