Mahakumbh 2025 : आखाड्यांतील साधूंचे महाकुंभक्षेत्रातून प्रयाण !

प्रयागराग (उत्तरप्रदेश), ९ फेब्रुवारी (वार्ता.) – मौनी अमावास्या आणि वसंतपंचमी या दिवसांच्या अमृतस्नानांनंतर विविध आखाड्यांतील साधूंनी कुंभक्षेत्रातून प्रयाण चालू केले आहे. अनेक आखाड्यांनी त्यांच्या शिबिरांचे पंडाल सोडले आहेत, तसेच अनेक आखाड्यांमधील साधूही निघू लागले आहेत. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या अनेक नागा साधूंनी त्यांच्या कुटीसुद्धा रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात उर्वरित नागा साधूही कुंभक्षेत्रातून प्रयाण करतील, अशी शक्यता आहे.