श्री सरस्वतीदेवीच्या पूजेनंतर उपाहारगृहात गेल्यावर घडली घटना !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये रेहान बाफल या मुसलमान तरुणाने उपाहारगृहामध्ये सर्वांसमोर विनयभंग केल्यानंतर घरी परतल्यानंतर एका १९ वर्षीय हिंदु विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आरोपी रेहान बाफल (वय ३० वर्षे) हा जातीय पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष मोहसीन हवालदार यांचा मुलगा आहे. मृत विद्यार्थिनी श्री सरस्वतीदेवीच्या पूजेला उपस्थित राहिल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीसमवेत उपाहारगृहामध्ये गेली होती.
मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले, ‘माझी मुलगी दुपारी घरी परतली, तेव्हा तिने सांगितले की, रेहानने सार्वजनिक ठिकाणी तिचा विनयभंग केला आणि मारहाण केली. यानंतर ती तिच्या खोलीत गेली. जेव्हा घरातील सदस्य तिला जेवायला बोलवायला गेले, तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा ती छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.’ मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी रेहानविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंची न पालटणारी स्थिती ! |