Sewage Water In Indrayani : मैलायुक्त सांडपाण्यामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्यावर कापसाप्रमाणे रासायनिक थर !

आळंदी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून सोडण्यात आलेले रसायनयुक्त सांडपाणी आणि जलपर्णी यांमुळे आळंदीत इंद्रायणीला पांढराशुभ्र फेस आला आहे. नदीपात्रात मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचे काम समाजकंटकांकडून सातत्याने होत असल्याने आळंदीत इंद्रायणीच्या पाण्याला काळपट रंग आणि कुबट दर्प येत आहेे. मागील २४-२५ वर्षे इंद्रायणी नदी प्रदूषित आहे. बांधकामाचा राडारोडा नदी पात्रात फेकला जातो. लोणावळा येथील विविध ठिकाणांच्या उगमस्थानांपासून ते तुळापूरजवळ संगमस्थानापर्यंत अनेकजण आपापल्या परीने नदी प्रदूषणास हातभार लावत आहेत. याचाच परिणाम इंद्रायणीवर सातत्याने पांढरा फेस तरंगतांना दिसत आहे. ३० जानेवारीला मध्यरात्रीपासून पाण्याला फेस येण्याचे प्रमाण वाढले.

गरुडस्तंभ ते जूनापुल परिसरात जलपर्णी पाण्यावर तरंगतांना दिसत होती. आळंदी नगर परिषदेचेही सांडपाणी प्रक्रियेविनाच नदीत मिसळले जात आहे.

संपादकीय भूमिका

इंद्रायणी नदी प्रदूषित होत असतांना प्रशासन काय करत होते ? नद्या प्रदूषित करणारे आणि त्यांना न रोखणारे यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !