कुंभपर्वात  साधूसंतांनी ‘राजयोगी (शाही) स्नान’ केल्याने त्या पाण्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात ?, या  संदर्भातील  संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. ( युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘प्रयाग (अलाहाबाद), हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे प्रत्येक १२ वर्षानी कुंभपर्वानिमित्त हिंदूंची  धार्मिक यात्रा भरते. तिला ‘कुंभमेळा’, असे म्हणतात. कुंभपर्व हे अतिशय पुण्यकारी असल्यामुळे त्या वेळी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे स्नान केले असता अनंत पुण्यलाभ होतो. म्हणूनच कोट्यवधी भाविक अन् साधूसंत त्या ठिकाणी जमतात. कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी विविध आखाड्यांतील साधूसंतांनी ठरवून घेतलेल्या क्रमाने स्वतःच्या आखाड्यातील सहसंत अन् शिष्य यांच्यासह स्नान करणे, याला ‘राजयोगी (शाही) स्नान’ म्हणतात.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत

‘कुंभपर्वात  साधूसंतांनी ‘राजयोगी स्नान’ केल्यावर त्या पाण्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.

राजयोगी स्नानाच्या वेळचे संग्रहित छायाचित्र

१. चाचणीतील नोंदींचे विवेचन

सौ. मधुरा कर्वे

या चाचणीत प्रयाग येथील पवित्र त्रिवेणी संगमाच्या पाण्याच्या पुढील ३ दिवशी ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

अ. राजयोगी स्नानापूर्वी : १४.१.२०१९ या दिनी (मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी)

आ. पर्वकाळी साधूसंतांनी त्रिवेणी संगमात राजयोगी स्नान केल्यानंतर : १५.१.२०१९ या दिनी (मकरसंक्रांतीच्या दिवशी)

इ. १७.१.२०१९ या दिनी (मकरसंक्रांतीनंतर २ दिवसांनी)

१ अ. प्रयाग येथील त्रिवेणी संगमातील पाण्याच्या नोंदी : प्रयाग येथील त्रिवेणी संगमातील पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. त्रिवेणी संगमाच्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१ अ १. प्रयाग येथील त्रिवेणी संगमाच्या पाण्यात मुळातच चैतन्य असणे : राजयोगी स्नानाच्या आदल्या दिवशी (१४.१.२०१९ या दिनी) त्रिवेणी संगमाच्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा १.४ मीटर होती. प्रयाग हे गंगा, यमुना आणि सरस्वती (ही नदी अदृश्य आहे.) यांच्या पवित्र अशा ‘त्रिवेणी संगमा’वर वसलेले तीर्थस्थान आहे. या पवित्र संगमामुळेच याला ‘प्रयागराज’ किंवा ‘तीर्थराज’ असे म्हटले जाते. सात्त्विक नद्यांचा संगम होतो, त्या ठिकाणच्या वातावरणात अधिक सात्त्विकता असते.

१ अ २. राजयोगी स्नानानंतर त्रिवेणी संगमाच्या पाण्यातील चैतन्यात वाढ होणे : राजयोगी स्नानानंतर पाण्यातील सकारात्मक ऊर्जा १.५८ मीटर होती, म्हणजे आदल्या दिवशीच्या तुलनेत ती अधिक आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. राजयोगी स्नानाच्या वेळी साधूसंतांकडून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे त्रिवेणी संगमाच्या पाण्यातील चैतन्यात वाढ झाली. यातून राजयोगी स्नानाचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते.

१ अ ३. पर्वकाळात कोट्यवधी भाविकांनी स्नान केल्यानंतरही त्रिवेणी संगमाच्या पाण्यातील चैतन्य टिकून रहाणे : १७.१.२०१९ या दिनी त्रिवेणी संगमाच्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १.३५ मीटर होती. गंगा परमपवित्र नदी आहे. पर्वकाळात कोट्यवधी भाविक गंगास्नान करतात, तरीही गंगेचे पाणी प्रदूषित होत नाही, उलट तिचे पावित्र्य टिकून रहाते. गंगेच्या पाण्यात ईश्वरी तत्त्व (चैतन्य) आकृष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे गंगेचे पाणी सदैव पवित्र असते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.१०.२०२४)